आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीआधीच सरपंचाची निवड; जनतेतून सरपंच निवडीतही राज्यातील पहिले गाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- शासनाने यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला असला तरी माजलगाव तालुक्यातील  रेणापुरी गावात  कोणतीही निवडणूक न घेता मागील ५० वर्षांपासून सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांची निवड बिनविरोध होत आहे. शुक्रवारी यंदाची अशीच  निवड झाली  आहे.
  
शासनाने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा गावा गावात सदस्यांचा निवडणुकीतील खर्च सरपंचाने करावा, असे संभाव्य सदस्य अटी घालत आहेत. माजलगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ४४ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबरला होत असताना निवडणूक न लढता तालुक्यातील रेणापुरी ह्या गावची गेल्या पन्नास वर्षापासूनची परंपरा जनतेतून सरपंच निवडीतही कायम ठेवत बीड जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. 

माजलगाव शहराजवळील पुनर्वसित  रेणापुरी येथील ग्रामपंचायत ५० वर्षांपासून  नाईकनवरे यांच्या ताब्यात आहे.   माजी सभापती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थानी  सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत  ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सात सदस्य बिनविरोध  निवडण्याचा निर्णय घेतला  गेला. त्याला ग्रामस्थांनी सहमती दिली. सर्वानुमते सरपंचपदही  दत्तात्रय नारायणराव नाईकनवरे यांची निवड करण्यात आली असून जनतेतील पहिल्या  सरपंचाचा मान त्यांना मिळाला आहे.   आरक्षित जागांवरही जातीनिहाय सदस्य निवडण्यात आले असून रोहिणी नाईकनवरे, अर्चना नाईकनवरे, सीताबाई घडसिंगे, कोमल पांचाळ , रामा चोरगे,आकाश जाधव व भिमा घडसे हे  सात सदस्य बिनविरोध निवडण्यात आले. निवडणूक प्रकिया सुरू झाल्यानंतर  या गावातून यांच्या व्यतिरिक्त कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही.  या बैठकीत किसनराव नाईकनवरे, विठ्ठलराव नाईकनवरे, माजी सभापती नितीन नाईकनवरे, अर्जुन नाईकनवरे, संभाजी नाईकनवरे,कल्याण नाईकनवरे निवृती गायकवाड, दिलीप नाईकनवरे,भगवान घडसेंसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडलेल्या सरपंचासह  सदस्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. 

निर्मल ग्रामचा पुरस्कारही
रेणापुरी गावात मतदारांची संख्या  साडेचारशे असून गावात सर्व विकास कामे करण्यात आली  आहेत.  गावातील शंभर घरासमोर ५०० झाडे असून त्यांना  ठिबक सिंचनचे पाणी आहे.   येथे ग्रामपंचायतीची निवडणूक होत नाही. दर ५ वर्षाला सर्वानुमते सरपंच व सदस्यांची निवड  बिनविरोध होते. स्वच्छतेत या गावाला दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मलगाव पुरस्कार मिळाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...