आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड तालुक्यातील जळकीबाजार येथील सरपंचपदाची निवड रद्द, दिल्‍ली सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - सर्वोच्च न्यायालय(दिल्ली)येथे झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील आदेशाला स्थगिती मिळाली. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील जळकीबाजार येथे मंगळवारी होणारी सरपंचपदाची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रद्द करण्यात आली.

कोरमअभावी ग्रामसभा घेतल्याच्या आरोपाखाली जळकीबाजार येथील सरपंच दैवशाला दांडगे यांच्या सरपंच पदाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. यानंतर विभागीय आयुक्तांकडे गेलेल्या या प्रकरणाला हाताळत आयुक्तांनी दांडगे यांना पदावरून दूर केले होते. याप्रकरणी दांडगे यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे दाद मागितली होती.त्यांनतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेश रद्द केला होता. पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होऊन २२ सप्टेंबर २०१६ ला दांडगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच पदावरून कमी केले होते. सदरील प्रकरण दांडगे यांनी १६ ऑक्टोबर ला मा. सर्वोच्च न्यायालय येथे दाखल केले होते. या प्रकरणाची मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे ९ डिसेंबरला सुनावणी झाली. त्यात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी होणारी सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याबाबतच्या सूचना तहसीलदारांना दिल्या. त्या अनुषंगाने मंगळवारी होणारी प्रक्रिया पुढील सुनावणीपर्यंत रद्द करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...