आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या वादातून विष पिऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- व्याजाचा पैसा व ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून केल्या जात असलेल्या जाचाला कंटाळून आरोपीच्या घरासमोर रविवारी विष घेतलेल्या लातूर तालुक्यातील भोयरा येथील माजी सरपंचाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांवर मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विलास तुकाराम माने (५५) असे मृताचे नाव आहे.

विलास यांनी गावातील सतीश गणपती घुट्टे यांच्या मध्यस्थीने २००३ मध्ये भावाच्या उपचारासाठी ४० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात त्यांनी त्यांची तीन एकर शेतजमीन संबंधिताच्या नावे लिहून दिली होती. विलास यांना त्यांची जमीन परत हवी असल्याने ते सतीश यांच्याकडे मुद्दल व व्याजाची रक्कम घेऊन गेले असता सतीश यांनी त्यांची जमीन परत करण्यास नकार दिला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सतीश घुट्टे यांचा पराभव झाला होता. त्यावरुन व व्याजावरुन सतीश व गावातील भरत फकीर माने, किसन तुकाराम बरडे व गंगाराम शेषेराव साळुंके यांनी विलास यांना १० जुलै रोजी दमदाटी केली होती. फोनवरून ते विलास यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देत होते. १७ जुलै रोजी विलास यांनी याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात सतीश यांच्याविरोधात तक्रारही दिली होती. शेवटी धास्तावून विलास यांनी रविवारी सतीश यांच्या घरासमोर जाऊन विष घेतल्याचे महादेव माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...