आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चळवळीतील शिक्षक हेलसकरांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू - सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी असणारे येथील सह्याद्रीनगरमधील रहिवासी, शिक्षक दत्तात्रय हेलसकर (४०) यांचा मंगळवारी (दि. आठ) नांदेड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हेलस (ता. मंठा) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ते शिक्षकदिनी शनिवारी (दि. पाच) मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाले होते.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेचे अध्यक्ष असलेले दत्तात्रय हेलसकर हे सातोना येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण मराठवाडाभर कथामालेचे उपक्रम, स्पर्धा परीक्षा, पुरस्कार वितरण आदी विविध उपक्रम राबवलेले आहेत.

दत्तात्रय हेलसकर हे शनिवारी शिक्षक दिन असल्यामुळे सेलूहून सातोन्याकडे दुचाकीवरून जात असताना पावडे हदगाव परिसरात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. हेलसकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.