आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंठा बाजार समितीवर सेना-भाजपचा झेंडा, सर्व जागांवर विजय; विरोधकांचा धुव्वा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंठा- मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी करण्यात आली. यात भाजप-शिवसेना युती पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीने सर्व १८ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. निकाल जाहीर होताच शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.   
बाजार समितीच्या १८ जागांपैकी ९ जागांवर यापूर्वीच भाजप-सेनेचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले होते. त्यामुळेच ही निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट झाले होते. सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.   

पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, भुजंगराव गोरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे युतीला घवघवीत यश मिळू शकले. सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तीन तासांतच मतमोजणीची पूर्ण झाली.
 
महिला सदस्य गैरहजर  
निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित संचालकांचा लोणीकर व बोराडेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मात्र या  समारंभाला निवडून आलेल्या सहा महिला संचालकांपैकी एकही महिला संचालक उपस्थित नव्हती.   त्यांच्या प्रतिनिधींचाच  सत्कार झाला.   
 
संचालक मंडळ  
नवनिर्वाचित संचालक मंडळात संभाजी खंदारे, उद्धव गोंडगे, संदीप गोरे, कैलास बोराडे, प्रल्हादराव  बोराडे, रामप्रसाद बोराडे, राजेश मोरे, अरुणा कदम, चंद्रभागा काळे, अनिता घोडके, नरसिंग राठोड, निवास देशमुख, गुंफाबाई काकडे, राधाबाई मोरे, नीलावती मोरे, सतीश निर्वळ, वैजिनाथ बोराडे,  मुस्तफा पठाण यांची वर्णी लागली आहे.
बातम्या आणखी आहेत...