आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नेते सुंदरराव सोळंके यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव आबासाहेब सोळंके (८६)यांचे बुधवारी रात्री ९.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रकाश, धैर्यशील, चंद्रकांत ही मुले, सुना, नातवंडे आहेत. १९६२ मध्ये ते बीड जि.प.चे पहिले अध्यक्ष झाले. १९६७ मध्ये केजमधून विधानसभेवर प्रथम निवडून गेले. १९७२ मध्ये गेवराईतून बिनविरोध निवडलेले एकटे आमदार ठरले. १९७९ मध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये सुंदरराव उपमुख्यमंत्री होते. गुरुवारी तेलगाव कारखाना येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.