आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डुकरांचा ‘बंदोबस्त' करा; कोर्ट अधीक्षकांचे आदेश, अहमदपूरच्‍य पोलिस ठाण्याला पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गुंड-पुंडांचा ‘बंदोबस्त' करतानाच नेत्याच्या सुरक्षेच्या बंदोबस्ताचे काम पोलिसांना करावे लागते. मात्र, अहमदपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधीक्षकांनी पोलिस ठाण्याला पत्र पाठवून न्यायालयाच्या आवारात उच्छाद मांडणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर हे एक महत्वाचं तालुक्याचं ठिकाणं. तालुका न्यायालयाबरोबरच काम वाढल्यामुळे तेथे अतिरीक्त सत्र न्यायालय कार्यान्वित झाले. मात्र, त्यासाठी तालुका न्यायालयाची जुनीच इमारत वापरण्यात येते. त्या इमारतीची आणि सुरक्षा भिंतीची दुरवस्था झाल्यामुळे न्यायालयाच्या आवारात सर्वच प्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यातही डुकरांनी उच्छाद मांडल्यामुळे न्यायालयाशी संबंधित सर्वच घटकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. कमालीची घाण आणि वरून मोकाट डुकरांच्या त्रासाला वैतागलेल्या न्यायालयाच्या अधीक्षकांनी बुधवारी थेट अहमदपूर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनाच पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले आहे की न्यायालयाच्या उत्तरेकडील बाजूस मोकाट डुकरांचा संचार आहे. डुकरांमुळे परिसर अस्वच्छ होतो आणि दुर्गंधी पसरते. त्यामुळे मोकाट डुकरांच्या मालकांना पोलिसांनी तंबी द्यावी. यापूर्वी कोर्ट ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचा-याला याबाबत तोंडी कळवूनही विशेष फायदा झाला नाही. त्यामुळे यावेळी पत्र गांभिर्याने घेऊन डुकरांच्या मालकांना बोलावून तंबी द्यावी आणि तसे केल्याचे कळवावे असे पत्रात आदेशित करण्यात आले आहे.
डुकरांचे अर्थकारण : डुक्कर या गलिच्छ प्राण्यामागच्या मोकाटपणामागे अर्थकारण दडले आहे. महाराष्ट्रात वडार समाजाकडे पारंपरिक पद्धतीने डुकरांचे स्वामित्व असते. उष्टे, खरकटे, मानवी विष्ठा खाणारा प्राणी डुकराच्या मांसाला मोठ्या शहरात चांगली मागणी असते. मोठ्या हॉटेलात त्याचे अनेक पदार्थही बनवले जातात. या मांसाची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते.
ते काम पोलिसांचे नाही
^सत्र न्यायालयाच्या अधीक्षकांनी पाठवलेले पत्र मिळाले आहे. मात्र, शहरातील मोकाट प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम आमचे नाही. ते पत्र आम्ही पुढील कार्यवाहीस्तव नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना पाठवले आहे. तसे केल्याचे पत्र न्यायालय अधीक्षकांनाही पाठवतोय.
मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक, अहमदपूर