आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ कारखाना; कामगारांचे काम बंदच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- संत एकनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणारे सचिन घायाळ शुगर लिमिटेडचे संचालक व कामगारांमध्ये एक महिन्याच्या पगारासाठी वाद सुरू आहेत. पगार मिळण्यासाठी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, तब्बल पंधरा दिवसांनंतरही हे काम बंद आंदोलन सुरूच आहे.

पगाराच्या वादात यंदा कारखाना बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही कामगार नेत्यांमुळे कारखाना बंद ठेवावा लागेल, अशी भूमिका घायाळ यांनी घेतल्याने १८ वर्षे कराराचा मुद्दा बाजूलाच राहिला आहे. कामगार नेते व घायाळ शुगर लिमिटेडमध्येच वर्षभरापासून वाद सुरू आहे. या वादात कारखाना बंद राहिला तर ऊस उत्पादक शेतकरी, चारशे कामगार, ऊसतोड मजूर यांच्या रोजगारीचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. काही कामगार नेते हा पगार देण्यापूर्वी आम्हाला प्रति महिना काही पैसे देण्याची मागणी करत असल्याचा आरोप चेअरमन सचिन घायाळ यांनी केल्याने "एकनाथ'च्या कामगाराचा संप कधी मिटणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या वादात संत एकनाथ कारखान्याच्या संचालकांचे दुर्लक्ष असल्याने वाद आणखी चिघळत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.