आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पानवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - वाढते शहरीकरण लक्षात घेऊन राज्य शासनाने फुलंब्री ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत केले. शनिवारी झालेल्या ग्रामसभेत नगर पंचायतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर फुलंब्री ग्रामपंचायतीचा सहावा वॉर्ड असलेल्या पानवाडी वसाहतीचा डोंगराळ भाग लक्षात घेऊन तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याबाबत ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पानवाडीकरांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी करून नगर पंचायतीमध्ये राहण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.

या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांना पत्र पाठवून दोन स्वतंत्र ग्रामसभा घेऊन अहवाल पाठवण्याबाबत आदेश दिले होते. अखेर या निर्णयावर शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे आता पानवाडी ग्रामपंचायत निर्मितीचा व फुलंब्री नगर पंचायत निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. या वेळी सरपंच सुहास शिरसाठ, उपसरपंच नितीन देशमुख, ग्रामविकास अधिकारी बी.डी. पेहेरकर उपस्थित होते.