आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सात दिवसांच्या गणरायास उदगिरात जल्लोषात निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा घोषणा देत आणि ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत उदगीर येथे गुरुवारी उत्साहात गणरायांना निरोप देण्यात आला.
परंपरेनुसार उदगीर येथे सात दिवसांचा गणेशोत्सव असतो. त्यानुसार सकाळी १० वाजता पारकट्टी गल्लीतील मानाच्या आजोबा गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते गणरायांची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक आर्य समाज मंदिराजवळ आली असता नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या हस्ते तर दुपारी एक वाजता चौबारा येथे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते गणेशाची पूजा करण्यात आली. पारकट्टी गल्ली, आर्य समाज मंदिर, चौबारामार्गे निघालेली ही मिरवणूक तळवे येथील सार्वजनिक विहिरीकडे हळूहळू मार्गस्थ होत होती. नांदेड नाका, शिवाजी चौक, देगलूर रोड आदी भागांतील मंडळाच्या मिरवणुकाही आर्य समाज मंदिर मार्गे विसर्जन विहिरीकडे रवाना होत होत्या.

विद्यार्थीही बंदोबस्तावर
कायदासुव्यवस्था बिघडू नये म्हणून एनसीसीचे ४०० विद्यार्थी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. त्यात गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांचाही समावेश होता. पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण हे संपूर्ण यंत्रणेवर देखरेख ठेवून होते.

१२ तास चालल्या मिरवणुका
उदगिरात५० सार्वजनिक मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. २० मंडळांनी जागेवरच तर ३० मंडळांनी मिरवणुकीने विसर्जन केले. १२ तास मिरवणुका सुरू होत्या. त्यात भक्त आणि कार्यकर्ते जल्लोष करत सहभागी झाले होते.

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एक अतििरक्त पोलिस अधीक्षक, नऊ उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, २६ सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक, ३५२ पुरुष महिला पोलिस, १५० होमगार्ड, सहा एसआरपीच्या तुकड्या आदींनी चोख ड्यूटी बजावली.