आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरग्याजवळ टँकरची टमटमला धडक, ९ ठार; सहा जण गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - ओव्हरटेकच्या प्रयत्नात टँकरने समोरून धडक दिल्याने टमटममधील ९ प्रवासी जागीच ठार, तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात उमरगा तालुक्यात तुरोरी तांड्याजवळ शनिवारी दुपारी ४ वाजता झाला.

तुरोरी येथील टमटम (एम.एच.२५ एम.०६९१) १५ प्रवासी भरून कर्नाटक राज्य सीमेकडे निघाला होता. पेट्रोल पंपासमोर टँकरच्या (एम.एच.४६ एफ ५५०९) चालकाने टमटमला धडक दिली. टमटमचा चक्काचूर झाला. टँकरचालक फरार झाला आहे. जखमींना ग्रामस्थांनी तत्काळ उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मृतांची नावे : टमटमचालक विष्णू भोसले, ख्वाजा रहेमान मासूलदार, सोनूबाई नरसय्या सास्तुरे, प्रकाश पांडुरंग मंडले (२१, तुरोरी), सुकुमारबाई पांडुरंग बंडगर, रायाबाई आगजीराव हाके, नंदिनी निवृत्ती बोधे यासह अन्य दाेघांचा मृतांत समावेश आहे.