आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या मुलीशी कुकर्म; पोलिसाला सक्तमजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- मित्राच्या 16 वर्षीय मुलीवर पोलिस विश्रामगृहात अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस जीपचालक जमील खान मुस्तफा खान पठाण यास जिल्हा न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश विनय बोरीकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
गतवर्षी 20 जानेवारीला ही घटना घडली होती. जिल्हा रुग्णालयात गेलेल्या मुलीला जमील आपल्या पत्नीला भेटण्यासाठी म्हणून जिप्सी गाडीने घेऊन गेला. बिंदुसरा गेस्टहाऊसमध्ये नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. मुलीने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर जमीलवर गुन्हा दाखल झाला होता. सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात दोन वैद्यकीय अधिकारी व मुलीचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला.

तीन जून रोजी अंतिम सुनावणी झाली. सबळ पुराव्याआधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय बोरीकर यांनी जमीलला दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नामदेव साबळे यांनी बाजू मांडली.