आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगिरी एक्स्प्रेस दरोडा प्रकरणी सात दरोडेखोर जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - परतूर रेल्वेस्थानकावर देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकणार्‍या 7 दरोडेखोरांना अवघ्या 12 तासांत रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. नांदेडहून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस (77058) रविवारी रात्री 9.30 वाजता परतूर रेल्वेस्थानकावर आली. दहा ते बारा दरोडेखोर हत्यारांसह रेल्वे लुटण्याचा प्रयत्न करीत होते. रेल्वेत तैनात असलेल्या चार रेल्वे पोलिस आणि दरोडेखोरांत धुमश्चक्री झाली.

यात कॉन्स्टेबल डी. डी. धनगर व हेडकॉन्स्टेबल के. प्रसाद गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जालना शहरातील दीपक रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य घेत औरंगाबाद, जालना व नांदेड रेल्वे पोलिसांनी एकत्र कारवाई करत 12 तासांत संजय शिवाजी चव्हाण, सुरेश रामराव चव्हाण, चंदर दादाराव पवार, डोंगर्‍या काळे, गोविंद लड्ड काळे, सनी लड्ड काळे, किरण रामा चव्हाण या सात दरोडेखोरांना पकडले. हे सर्व आरोपी परतूर येथील आहेत. पोलिस रेकॉर्डनुसार हे सर्व अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. रेल्वेत दरोड्याची घटना घडणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी तीन दिवस अगोदरच औरंगाबाद येथील अधिकार्‍यांना याची माहिती देऊन सुरक्षेसाठी बंदुकीची मागणी केली होती. वरिष्ठांनी याचे गांभीर्य घेतले नव्हते. शेवटी परतूर येथे दरोडा पडल्यानंतर या स्थानकावर चार रेल्वे पोलिस व एका बंदूकधारी अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे.