आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्या व्यवसाय चालवणा-या चार जणांसह पाच महिलांना ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहरातील अलंकार चौक भागातील मयूर लॉजवर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून वेश्या व्यवसाय चालवणा-या चार जणांसह पाच महिलांना ताब्यात घेतले. शहरातील अलंकार चौकात गणेश आर्केड कॉम्प्लेक्समध्ये मयूरी लॉजवर वेश्याव्यवसाय चालवला जातो, अशी माहिती पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांना मिळाली होती.
पोलिस अधीक्षक सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना घटनास्थळी छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी मयूरी लॉजवर वेश्याव्यवसाय चालत असल्याबद्दल खात्री केल्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. याठिकाणी पाच महिला आढळून आल्या. तसेच व्यवसाय चालविणा-या नारायण धनदास वैष्णव, अलकेश शिवरतन खाकीवाले, दिलीप दौलतराव रंधवे, किशन पाटीलबा गायकवाड यांना ताब्यात घेतले.