आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत विवाहितेवर लैंगिक अत्याचार, तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मागील सहा वर्षांपासून एका विवाहित महिलेची अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ क्लीप काढून व तिला सातत्याने धमक्या देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाच जणांवर येथील नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली, तर दोघे फरारी आहेत. दरम्यान, तिघांना रविवारी (दि. ११) येथील न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी पीडित महिलेने नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील रहेमतनगर भागातील विवाहितेचा नातेवाईक असलेला आझम इब्राहिम बागवान हा भिशी चालवत असे. त्याने या विवाहितेला २०११ मध्ये भिशीचे पैसे देण्यासाठी घरी बोलावले. त्याने घरात कोणीच नसल्याचा फायदा उठवत जबरीने तिच्यावर बलात्कार केला.
त्याने तिचे अश्लील फोटो काढले तसेच व्हिडिओ क्लीपदेखील तयार केली. त्याआधारे त्याने तिला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वारंवार घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत या प्रकाराची वाच्यता केल्यास व्हिडिओ व छायाचित्रे प्रदर्शित करण्याची तो धमकी देत असे. हळूहळू त्याने या प्रकारात काही मित्रांनादेखील सामावून घेतले.
त्याच्यासह अब्दुल खलील बागवान ऊर्फ चाऊस, शफिक हबीब, इद्रिस युनूस बागवान, अब्दुल खलील अब्दुल सत्तार या पाच जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर त्यांनी तिच्या घरी जाऊनदेखील अत्याचार सुरू केले. हा प्रकार त्या विवाहितेच्या मुलाने पाहिल्यानंतर वडिलांना सांगितले. त्यामुळे तिच्या पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर ती सात-आठ महिन्यांपासून आपल्या माहेरीच वास्तव्यास आहे.

लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपींनी तिच्याकडे सातत्याने पैशाची मागणीदेखील करीत दीड लाख रुपये उकळल्याचेही तिने म्हटले आहे. या प्रकरणात आणखी सहा ते सात आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून गुन्हा दाखल होताच यातील अब्दुल खलील अब्दुल सत्तार, शफिक हबीब, खलील बागवान ऊर्फ चाऊस या तिघांना नानलपेठ पोलिसांनी अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आझम इब्राहिम बागवान या महिलेच्या नात्यातीलच असून त्याच्यासह इद्रिस युनूस बागवान हादेखील फरार आहे. या दोघांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रणिता बाभळे, शेख जावेद हे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...