आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sexual Exploitation Of Minor Girl In Hingoli, Crime Logde Against 11 People

हिंगोलीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, रॅकेट चालवणा-या महिलेसह ११ जणांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - तब्बल ८ महिन्यांपासून १७ वर्षीय व अनुसूचित जातीच्या मुलीचे लैंगिक शोषण करणा-या १० जणांसह दलाल महिलेवर शहर पोलिसात शुक्रवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामुळे शहरातील इतर ठिकाणी चालू असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

शहराजवळील बळसोंड भागात राहणा-या अल्पवयीन मुलीला तिच्या गरिबीचा फायदा घेऊन शहरातील सुनीता घोगरे या महिलेने जाळ्यात ओढले. या मुलीला ८ महिन्यांपूर्वी प्रथम बबलू शर्मा नावाच्या तरुणाच्या ताब्यात देण्यात आले. शर्माने उपभोग घेतल्यानंतर चेतन बांगर, विशाल, अजय, महादेव कांबळे, शेख जमीर, पाटील, बाबूराव आणि अजयचे दोन मित्र अशा १० जणांनी मुलीवर पैशाचे आमिष दाखवून बबलू शर्माची खोली, चेतन बांगरचे खटकाळी भागातील शेतात व इतर अनेक ठिकाणी बलात्कार केला. प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून या टोळक्यावर पाळत ठेवली. या कामी दोन पोलिसांना नियुक्त करण्यात आले. १५ जानेवारीला मुलीला बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आले. रात्री तिची चौकशी केली आणि बड्या आरोपींची नावे समोर आली. गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी शुक्रवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल झाला.

आरोपींना कोठडी
या प्रकरणात पोलिसांनी सुनीता घोगरे, बबलू शर्मा आणि चेतन बांगर या आरोपींना अटक केली आहे. हिंगोली न्यायालयाला सुटी असल्याने \\त्यांना शुक्रवारी वसमत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांनी हजर केले असता त्यांना १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. आरोपींविरुद्ध बलात्कारासह, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.