आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहागड बंधाऱ्याचा दरवाजा तुटला, पाण्याचा अपव्यय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- कमी पावसामुळे बीड जिल्हा दुष्काळाचे चटके सोसत असताना गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्याचा दरवाजा पाण्याने खराब होऊन गुरुवारी सकाळी सहा वाजता तुटला. यामुळे बंधाऱ्यातील १.५० दलघमी पाणी वाया गेले आहे. हा पाणीसाठा गेवराई शहराला एक महिना पुरला असता.

गेवराई शहराला सध्या शहागड येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होत असून बंधाऱ्याचे अनेक वर्षांपूर्वी बांधकाम झाले आहे. काही वर्षांपूर्वी जालना, अंबड, गेवराई या तीन शहरांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, जालना व अंबडची पाण्याची व्यवस्था पैठण येथून दुसऱ्या मार्गाने करण्यात आली आहे. सध्या या बंधाऱ्यातून फक्त गेवराई शहरासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास या बंधाऱ्याचा दोन मीटरचा एक दरवाजा खराब होऊन तुटल्याने शहराला एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा वाया गेला आहे. यापूर्वी याच बंधाऱ्याचे गेट अज्ञात माथेफिरूने उघडून पाणी सोडून दिले होते. आता याच बंधाऱ्याचे गेट तुटल्याने पाणी वाया गेले आहे. गुरुवारी हा प्रकार कळताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्यासह नगरसेवकांनी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली.