आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवानी तलवार अलंकार महापूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी (दि.३) भवानी तलवार पूजा मांडण्यात आली होती. याचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, सोमवारी (दि.५) दुपारी होमात पूर्णाहुती देऊन शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

शाकंभरी नवरात्रोत्सवात सहाव्या माळेला पहाटे चरणतीर्थ नित्योपचार पूजा करण्यात आली. त्यानंतर दर्शनास प्रारंभ झाला. अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली, तर सायंकाळी अभिषेक पूजेनंतर रात्री १०.३० वाजता छबिना मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे माता-पुत्राचे नाते मानले जाते. धर्मरक्षणासाठी व स्वराज्य स्थापनेसाठी तुळजाभवानीने छत्रपती शिवरायांना भवानी तलवार दिली, अशी आख्यायिका सांगितली जाते. देवीचे महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा यांच्यासह पुजार्‍यांनी या पूजेसाठी पुढाकार घेतला.

शाकंभरी महोत्सवाची आज सांगता
सोमवारी दुपारी १२ वाजता गणेश ओवरी येथे होमकुंडात मुख्य यजमान अभिमन्यू बोधवड यांच्या हस्ते सपत्नीक पूर्णाहुती देऊन घटोत्थापनाने शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.