आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिषासुरमर्दिनी रूपात तुळजाभवानीची पूजा, दोन लाख भाविक, शाकंभरी उत्सवाची आज सांगता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचे रविवारी (दि. ४) दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, सकाळी १० वाजता वैदिक होमास प्रारंभ करण्यात आला, तर सोमवारी दुपारी १२ वाजता होमकुंडात पूर्णाहुतीने शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता होईल.
शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेच्या दिवशी रविवार सुटीमुळे भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. धर्मदर्शनासाठी ३ ते ३.३० तासांचा, तर मुखदर्शनासाठी तासाभराचा वेळ लागत होता. तत्पूर्वी सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीला महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन नंतर महिषासुरमर्दिनी पूजा मांडण्यात आली.
त्यानंतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला. सकाळी १० वाजता गणेश ओवरीत शाकंभरी देवीसमोर वैदिक होमास प्रारंभ करण्यात आला. सोमवारी (दि. ५) दुपारी होमकुंडात पूर्णाहुती देऊन शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.