आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Narendra Modi, BJP, Nationalist Congress

मोदींच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांच्यावर उपचार करा, पवारांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी (जि.जालना) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घनसावंगी येथील प्रचारसभेत जोरदार उत्तर दिले. ज्या काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्या पक्षाबद्दल मोदी ऊठसूट ‘काँग्रेसमुक्त भारत घडवायचा आहे’ असे विधान करतात. मोदींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका करून भाजपच्या कोणत्या नेत्याने स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या, एक तरी मायचा सपूत तुरुंगात गेला का, असा खडा सवाल या वेळी पवारांनी केला. परभणीतील राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्यासाठी त्यांनी रविवारी प्रचारसभा घेतली.

मदतीसाठी मंत्रिगटाची बैठक घेणार
शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे. प्रत्येक वेळी केंद्र व राज्य सरकार मदत करीत आहेत. या वेळेस केंद्राची मदत मिळवण्यासाठी उद्याच मंत्रिगटाची बैठक घेऊन तातडीने मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आचारसंहिता सुरू असल्यामुळे मदतीबाबत अधिक बोलता येणार नाही, असेही पवार म्हणाले.

काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. भाजपच्या कोणत्या नेत्याने स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या, एक तरी मायचा सपूत तुरुंगात गेला का?
- शरद पवार