आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गोपीनाथ मुंडे झोपेतही बरळतात\', बीड शहरातील सभेत पवारांचा घणाघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - ‘मी व्यक्तिगत कोणाबद्दल बोलत नसतो. त्यातही उगीच कशाला कोणाचं नाव घ्यायचं! तेवढं महत्त्व असेल तरच नाव घ्यावं. पण माझ्या नावाने काही जण झोपेतही बरळतात. पवार पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत ! मी निवडणूक लढवत नाही, लोकसभेत जायचा प्रश्नही नाही, मग गुडघ्याला बाशिंग कोणाच्या ?’ या शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचा नामोल्लेख टाळत हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ बुधवारी रात्री येथे शरद पवारांची जाहीर सभा झाली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, उमेदवार धस, आमदार अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना एकाच दिवशी एक मे 1960 रोजी झालेली आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या काळातच गुजरातचा विकासदर वाढला. मात्र, 2001 पासून नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यापासून आजपर्यंत गुजरातचा विकासदर 17 टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर आला आहे. या मोदींना पंतप्रधान होऊन देशाचा विकासदर कमी करायचा आहे. परंतु देशातील जनता त्यांच्या हाती सत्ता कधीच सोपवणार नाही.
एकदा पाच वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री झालेली व्यक्ती कधी दिल्लीत मंत्री तर कधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्याची भाषा करत आहे. यासाठी कार्यकर्तृत्व लागते. मी पाहतोय, संसदेत बीड जिल्ह्यातील एकही प्रश्न त्यांनी मांडला नाही.

पुढील स्लाइडमध्ये, धनंजय मुंडे यांची काकांवर टीका