आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar Said Modi Wave Ended, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखवणा-या मोदींची लाट ओसरली - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखवणा-या मोदींची लाट तीनच महिन्यांत ओसरली. आम्ही तर शेतक-यांचे ७० हजार कोटी कर्ज माफ केल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
भोकरदन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार पुंडलिकराव दानवे होते, तर पालकमंत्री राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार चंद्रकांत दानवे, सारंगधर महाराज आदींची उपस्थिती होती. मोदी सरकारने कापूस, साखर, शेती मालाच्या निर्यात अनुदान बंद केले. त्यामुळे शेतीमालाला भाव कसे मिळणार, असा सवाल त्यांनी केला. राज्यात चांगले सरकार हवे असेल राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात आमदार चंद्रकांत दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली.