आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शेतीमालापेक्षा आयपीएल सामन्यांचे भाव माहीत असतात. सरकार मालाला भाव देत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला, आत्महत्या वाढत आहेत, असा आरोप प्रदेश भाजप अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.
सीलिंगच्या कायद्याप्रमाणे 1956 मध्ये जमिनी वाटप झाल्याचा सरकारकडे हिशेब नाही. तेव्हाच्या जमिनी अनेक नेत्यांनीच लाटल्या, असा आरोप करून फडणवीस म्हणाले की, आता सीलिंगसारखा कायदा संमत केल्यास त्याचा भूमिहीनांऐवजी मूठभर कंपन्यांना लाभ होणार आहे. मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी मंत्र्यांनी लाटल्या. यावर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाला पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही. आरक्षण द्यायचेच आहे तर तेरा वर्षांत का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करून ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याला भाजपचा पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.