आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करा; अन्‍यथा 14 सप्टेंबरपासून जेलभरो - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - कधी नव्‍हे ते मराठवड्यात भीषण दुष्‍काळ पडला. मागील 48 वर्षांत मी अशी भीषण परिस्थिती पाहिली नाही. त्‍यामुळे शासनाने दुष्‍काळग्रस्‍त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी; अन्‍यथा राष्‍ट्रवादी काँग्रेस राज्‍यभर 14 सप्‍टेंबरपासून जेलभरो आंदोलन करेल, असा इशारा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांनी दिली. ते आज (रविवार) जिल्‍ह्यात दुष्‍काळी परिस्थितीचा आढावा घेण्‍यासाठी आले होते.
पवार पुढे म्‍हणाले '' 2 जूनला आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पावसाविना परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये स्थिती बिकट झाल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आणून दिली. तसेच आताच उपाययोजना करायला हवी, असेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले. दरम्‍यान, पावसाळा संपत आला असतानाही शासनाकडून काहीच उपाययोजना केल्‍या गेल्‍या नाहीत. कृत्रिम पावसाचा प्रयोगही फेल गेला. त्‍यामुळे शासनाने आता तातडीने मदत जाहीर करावी'', अशी मागणीही त्‍यांनी केली.
पंतप्रधान मोदींवर केली टीका
पंतप्रधान मोदी यांनी स्‍वातंत्र्य दिनी कृषी मंत्रालयाचे नाव बदलण्‍याची घोषणा केली. पण, त्‍यामुळे खरोखरच शेतकर्‍यांचे भले होणार आहे का, असा खोचक सवाल करत पवार यांनी मोदींवर टीका केली. दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.