आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संघटना ‘देवगिरी’वर मोर्चा काढणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री । देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतक-यांसह शेतकरी संघटना 20 जानेवारी रोजी कारखान्यावर मोर्चा काढणार आहे.
देवगिरी कारखाना संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक, कामगार अडचणीत आले आहेत. अनेक शेतक-यांचा ऊस गाळपाअभावी पडून आहे, तर अनेकांचा ऊस पाण्याअभावी सुकू लागला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांना ऊस देणे परवडणारे नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या विषयावरून संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही संचालक मंडळ उदासीन दिसते. संचालक मंडळाला जागे करण्यासाठी शेतकरी संघटना येत्या 20 तारखेला कारखान्यावर धडक मोर्चा काढणार आहे. जिल्हाधिका-यांना संघटनेने निवेदन दिले आहे. मोर्चात कामगार, शेतकरी, तोडणी वाहतूकदार सहभागी होणार आहेत.