आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाधिका-यांनी 28 शाळा गाळल्या; अहवालात प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा अजब दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जिल्हा प्रशासनाने केलेल्या पटपडताळणीच्या अहवालात 50 टक्क्यापेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांची मान्यता रद्दचे आदेश आल्यानंतर हा अहवालच बोगस ठरवण्याचे प्रयत्न लातूरच्या शिक्षण विभागाकडून केले जात आहेत. जिल्हाधिकाºयांच्या अहवालात कारवाईयोग्य शाळांची संख्या 140 दाखवण्यात आली होती. मात्र, शिक्षणाधिका-यांनी हा आकडा 122 असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे 28 शाळांची नावे कधी आणि कुणी वगळली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिका-यांच्या अहवालात प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा अजब दावा शिक्षणाधिकाºयांनी केला आहे, तर आमचा अहवाल योग्यच असून त्यात कसलीच चूक नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकाºयांनी सांगितले आहे.
बोगस पटसंख्या दाखवून शासकीय अनुदान हडप करण्याचा प्रकार शाळांनी वाढवल्याने त्याला छेद देण्यासाठी 3 ते 5 आॅक्टोबर 2011 या कालावधीत राज्यातील शाळांत विशेष पटपडताळणी मोहीम राबवण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात महसूल विभागाने केलेल्या पटपडताळणीत 50 टक्केपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या 140 शाळा आढळल्या होत्या. तसा अहवालही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. अशा शाळांवर कार्यवाही करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सज्ज झाले आहे. तथापि, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 50 टक्के अनुपस्थिती असलेल्या शाळांच्या यादीत फरक आला आहे. जिल्हा परिषद अशा शाळा 112 शाळा असल्याचे सांगत आहे.
आमची यादी वस्तुनिष्ठच- आम्ही वस्तुस्थितीची शहानिशा करूनच पडपडताळणी केली आहे. जो अहवाल आहे तो बिनचूक आहे. 50 टक्केपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळा 140 आहेत.’’- शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर
जिल्हाधिका-यांची यादी सदोष - जिल्ह्यात 50 टक्क्यापेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित असलेल्या शाळांची संख्या अधिक नाही. जिल्हा प्रशासनाच्या यादीत प्रिंटिंग मिस्टेकस् झाल्या असल्याने ती अधिक दिसत आहे. यादी दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. ’’- विलास जोशी, शिक्षणाधिकारी, लातूर
2438 एकूण शाळा
1344- झेडपी
77- आश्रमशाळा
1017 - खासगी संस्था
07 - नगर परिषद