आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिमाखात आगमनछः सिमल्याच्या सफरचंदाची बाजारात चलती विदेशीला टाकले मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - चार महिन्यांपासून फळ बाजारात असणाऱ्या विदेशी सफरचंदांना मागे टाकत सिमला येथील देशी सफरचंदाचे बीडमध्ये दिमाखात अागमन झाले असून येत्या आठवड्यात आवक वाढणार आहे. त्यामुळे सफरचंदाचे दरही कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडणार आहे.

भारतीय सफरचंदांची आवक कमी झाल्यानंतर येथील फळ बाजारात चार महिन्यांपासून वॉशिंग्टन, चीन, न्यूझीलंडमधील सफरचंदाची आक होत होती. २०० रुपये किलोप्रमाणे भाव चढते होते. मध्यम प्रतीचे सफरचंद दीडशे रुपये किलो विकले जात होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेशातील बाजारातून सिमला सफरचंदांची मोठी आवक सुरू झाली आहे. मागील आठवड्यात येथील बाजारात जवळपास ५० टनपेक्षा जास्त सफरचंदांची आवक झाली. सध्या सिमला सफरचंदाचे भाव ८० ते १०० रुपये किलोपर्यंत आहेत. आवक वाढल्यास या दरात आणखी घसरणीची शक्यता असून भाव ६० रुपये किलाेपर्यंत उतरतील असा अंदाज आहे. आंब्यानंतर सफरचंदाबरोबरच काश्मीर भागातील नास्पती, पियर्स तसेच स्थानिक परिसरातून डाळिंबाची आवक होत आहे.
सिमला आवडीचा
काश्मीर भागातून येणारे डिलक्शन सफरचंद खाण्यास मुलायम व रवेदार असतात. या तुलनेत सिमला सफरचंदामध्ये ओलावा किंचित जास्त असतो. चविष्ट असतात आणि इतर सफरचंदांच्या तुलनेत दर कमी असल्याने सर्वसामान्य पसंती दर्शवतात.
डाळिंबाची आवक
बीड तालुक्यातील शिवणी, लिंबागणेश, गेवराईतील मादळमोही, उमापूर, शिरूरच्या खालापुरी भागातून भगवा डाळिंबाची आवक होत आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला दर्जानुसार प्रती कॅरेट सहाशे ते नऊशे रुपये, तर साधारण डाळिंबाला ३०० ते ४०० रुपये भाव मिळत आहे.
ग्रीन अॅपलही आकर्षण
सिमला लाल सफरचंदाबरोबरच ग्रीन अॅपलही येथील फळबाजारात ग्राहकांना आकर्षित करत आहेत. ८०० ते १००० रुपये एका पेटीचा भाव असून किरकोळ भाव ८० ते १०० रुपये किलो आहे. तुलनेत या सफरचंदामध्ये गाेडवा कमी असल्याने ग्राहकही पसंती दर्शवतात.
आवक वाढताच स्वस्त
यंदा सिमला, काश्मीर भागात सफरचंदाचे चांगले पीक आले आहे. आठ दिवसांपासून सिमला सफरचंदाची आवक होत आहे. पुढील आठवड्यात आवक वाढल्यास ग्राहकांना स्वस्त दरात सफरचंद मिळू शकतील.
हारुण अब्बास बागवान, फळांचे ठोक व्यापारी, बीड
बातम्या आणखी आहेत...