आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंनी हिंदूंचा अपमान केला : प्रविण तोगडिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - हिंदू आतंकवाद कुठेच सिद्ध झालेला नसताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून देशातील शंभर कोटी हिंदूंचा अपमान केला आहे. त्यांनी आपले शब्द तत्काळ मागे घेऊन माफी मागावी. काँग्रेसला हिंदूंची घृणा आहे का ते एकदा स्पष्ट करावे, असे आव्हान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्‍ट्रीय महामंत्री डॉ. प्रवीण तोगडिया यांनी काँग्रेसला दिले. वजिराबाद येथील केतन नागडा यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेसचा व्यवहार हिंदूंविरोधी आहे, याबाबत काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेसचा हिंदू मतदार आहे. देश स्वतंत्र होण्याअगोदर हिंदूंचे मत काँग्रेसला, तर मुस्लिमांचे मत मुस्लिम लीगला पडत असे. आज नांदेडमध्ये मुस्लिमांचे मतदान ‘एमआयएम’ला मिळाले तर हिंदूंचे मत काँग्रेसला मिळाले आहे. याची त्यांनी जाणीव ठेवावी. काँग्रेसची हिंदूविरोधी पॉलिसी नसेल तर त्यांनी 100 कोटी हिंदूंची माफी मागावी. अन्यथा हिंदू त्यांना लोकतांत्रिक प्रक्रियेतून उत्तर देतील, असेही ते म्हणाले.