आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन शोषखड्ड्यांच्या प्रयोगात खिर्डी राज्यात पहिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील खिर्डी हे गाव दोन शोषखड्ड्यांच्या प्रयोगात भारतात दुसरे, तर महाराष्ट्रात पहिले आहे. धरणीमातेसाठी शोषखड्ड्यातील सोनखत हे खरं सोनं असून मराठवाडा हागणदारीमुक्त करण्यासाठी खिर्डी गावाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन प्रधान सचिव राजेशकुमार यांनी केले. खिर्डी येथे घेतलेल्या दोन शोषखड्ड्यांच्या शौचालयातील सोनखत प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. 
 
प्रारंभी ग्रामस्थांनी घरोघर स्वच्छतेची गुढी उभारून प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मुख्याधिकारी मधुकर आर्दड यांच्यासह आठ जिल्ह्यांतील मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांचे गावातून टाळ-मृदंगाच्या निनादात जंगी स्वागत केले.
 
दोन शोषखड्ड्यांच्या प्रयोगाची सुरुवात १७ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून पहिल्यांदा खिर्डी गावातून करण्यात आली होती.   विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर म्हणाले, खिर्डी गाव २००९ मध्ये हागणदारीमुक्त झाले.  सोनखत शेतीसाठी सोने आहे. खिर्डी येथील दोन शोषखड्ड्यांचा प्रयोग भारतात दुसरा, तर राज्यात पहिला ठरला आहे. दोन आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाडा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प या वेळी भापकर यांनी केला.दरम्यान, खुलताबाद तालुक्यात ३९ गावे हागणदारी मुक्त झाली. खिर्डीने २००९ मध्ये हागणदारी मुक्त होण्याचा सर्वप्रथम  मान मिळवला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...