आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिपदासाठी सरकारला दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम, दसऱ्यापर्यंत अाग्रही असलेल्या मेटेंकडून मुदतवाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - ‘मराठा आरक्षण या सामाजिक प्रश्नावरच आम्ही आघाडी सरकारची साथ सोडली होती. सध्या राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघत असून मुंबईतही मोर्चा होणार आहे. या मोर्चानंतर राज्य सरकार काय भूमिका घेतेय ते पाहून सरकारसाेबत राहण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र हे आरक्षणाचा सामाजिक प्रश्न जर हे सरकार सोडवत नसेल तर त्यांच्यासाेबत राहायचे कशाला?’ असा सवाल ‘शिवसंग्राम’चे आमदार विनायक मेटे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलतांना केला. तसेच मंत्रिमंडळात समावेशासाठी पूर्वी दसऱ्यापर्यंत अल्टीमेटम देणाऱ्या मेटेंनी अाता सरकारला दिवाळीपर्यंतची मुदत दिली.

राज्य सरकारने दिवाळीपर्यंत मंत्रिमंडळात समावेशाचा निर्णय घेतल्यास शिवसंग्रामच्या औरंगाबाद येथे नोव्हेंबरला होणाऱ्या राज्य अधिवेशनात सरकारच्या विरोधात कठोर निर्णय घेणार असल्याचे मेटे म्हणाले. मुंबई येथे गुरूवारी शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत राज्याचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, उपस्थीत होते. कार्यकारिणीच्या बैठकीत ९५ टक्के पदाधिकाऱ्यांनी आमदार मेटे यांना दिवाळीपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम देण्याचे सुचवले. लोकसभा विधानसभा निवडणूकात ‘शिवसंग्राम’ भाजपाच्या बरोबर होता. सरकाने सामाजिक आश्वासनपूर्ती केली नाही. शेतकरी निवृत्ती वेतन, मराठा आरक्षण आदी प्रश्न निकाली काढलेच नाहीत असे मेटे म्हणाले.

नाेव्हेंबरला औरंगाबादेत अधिवेशन
सहा नाेव्हेंबर रोजी शिवसंग्रामचे राज्य अधिवेशन औरंगाबादेत होणार अाहे. मराठा समाजाचे माेर्चे पाहता मराठ्यांच्या बाजुने कोणतेच पक्ष सभागृहात बोलत नाहीत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. त्या प्रमाणे सरकाने मराठा आरक्षण अॅट्रॉसिटीबाबत तीन दिवसांचे अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी बोलवावे ही आमची मागणी आहे, असे मेटे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...