आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena And NCP Dispute At Beed, News In Marathi

शिवसेना-राष्ट्रवादीत रणकंदन; 14 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- सिमेंट रस्त्याच्या कारणावरून शिवसेनेच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाच्या गटावर तलवारीने हल्ला केला. राष्ट्रवादीच्या गटाने काठय़ांचा वापर करून हा हल्ला परतवला. ही घटना बीड तालुक्यातील बाभळवाडी येथे शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली. दोन्ही गटांचे 14 जण जखमी झाले असून पाच गंभीर आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या गटाचे अभिमान सातपुते यांच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या 16 जणांविरुद्ध, तर शिवसेनेच्या अशोक फिरंगे यांच्या तक्रारीवरून 10 जणांविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक अभय डोंगरे व पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मधुकर प्रधान यांनी बाभळवाडीला भेट देऊन शांततेचे आवाहन केले. वर्षभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून बाभळवाडीत 2 गटांत गोळीबाराची घटना घडली होती. त्यामुळे गावात बंदोबस्त वाढवण्यात आला.