आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Workers Beat Eachother, Charge Filed Against MP Jadhav

शिवसेना-भाजप पदाधिका-यांत हाणामारी, खा. जाधवांवर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांत जुन्या वादाची ठिणगी रविवारी रात्री पडली. जिंतूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये दोन्ही गटांत झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही गटांकडून आलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. यात शिवसेनेचे खासदार संजय जाधव व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यावर कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

शिवसेना-भाजपमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढला असून त्यात प्रामुख्याने खा. संजय जाधव यांचे कट्टर समर्थक वसंत मुरकुटे व त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढू लागला आहे. अलीकडील काही दिवसांत मुरकुटे हे भाजपच्या गोटात सक्रिय झाले आहेत. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भरोसे यांच्यासह काही भाजप कार्यकर्त्यांचाही खासदार जाधव यांच्याशी असलेला वाद कायम आहे. या वादाचे रूपांतर रविवारी प्रत्यक्ष हाणामारीत झाले. इनायतनगरातील हॉटेलमध्ये रविवारी रात्री दहाच्या सुमारास वसंत मुरकुटे हे नातेवाइकासोबत जेवण घेत असताना खा. जाधव यांच्यासह व्यंकटी शिंदे, रामप्रसाद रणेर व अन्य एकाने जुन्या वादावरून मुरकुटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी मुरकुटे यांनी फिर्याद दिली आहे, तर खा. जाधव यांचे समर्थक प्रवीण गोमचाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत आपण हॉटेलमध्ये जेवण आणण्यासाठी गेलो असताना मुरकुटे यांच्यासह भरोसे, नगरसेवक दिलीप ठाकूर, किरण भूमकर व पोलिस कर्मचारी टाकरस या चौघांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. याच प्रकरणात शिवसेनेचे संजय सारणीकर यांनीही दिलेल्या फिर्यादीत भरोसे, मुरकुटे यांच्यासह दिलीप ठाकूर, भूमकर व टाकरस या चौघांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली, असे म्हटले आहे.