आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Congress Dispute In Vaijapur Krishi Utpanna Bazar Samity

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीत शिवसेना, काँग्रेसचे मतभेद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी शिवसेना विरुद्ध काँग्रेसच्या संचालक मंडळामधील राजकीय वाद शिगेला पोहोचला आहे. बाजार समितीतील चार रिक्त जागांसाठी सात जूनला घेण्यात येणार्‍या नोकरभरती प्रक्रियेला काँग्रेस संचालकांनी राजकीय बळाचा वापर करून पणन संचालक कार्यालयाकडून स्थगिती आदेश आणून कुरघोडी केली आहे. शिवसेनेची बाजार समितीत एकहाती सत्ता असणार्‍या सभापती अ‍ॅड. आसाराम पाटील रोठे सचिव व संचालकांनी दीड वर्षांच्या कार्यकाळात विविध उपक्रमाच्या आयोजनाच्या नावाखाली संस्थेत 35 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक संजय पाटील निकम, ज्ञानेश्वर जगताप, अ‍ॅड.आर.डी. थोट, सुरेश तांबे,उल्हास ठोंबरे, अरुण पवार, मंगला गायके यांनी केला. तसेच पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

नोकरभरतीत अडचणी
शिवसेनेने बाजार समितीमधील चार रिक्त पदांसाठी नोकरभरतीची जाहिरात कमी खप असलेल्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करून आपल्या मर्जीतील व नातेवाइकांची या पदावर वर्णी लावण्यासाठी केलेल्या गुपचूप कारभाराला काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी संचालक संजय पाटील निकम, ज्ञानेश्वर जगताप, अ‍ॅड. आर.डी.थोट या तीन संचालकांनी सुरुंग लावला. बुधवारी तीन संचालकांनी पणन संचालक कार्यालयाला नोकरभरतीची तक्रार करून या प्रक्रियेला स्थगिती दिली.

स्थगितीचे आदेश
पणन संचालक कार्यालयाने बाजार समिती प्रशासनाला काँग्रेस संचालकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नोकरभरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे पत्र दिले, तर 20 जूनला पणन संचालक कार्यालयात आवश्यक कागदपत्रे तसेच पुराव्यासह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.