आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवतला शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मानवत येथील राघवेंद्र जिनिंगमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर हे मतदारांना पैसे वाटप करीत असल्याच्या माहितीवरून शिवसेनेच्या पदाधिका-यांनी तेथे जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी मानवतमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

जिनिंगमध्ये काँग्रेसकडून पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश कच्छवे व उपशहरप्रमुख अशोक शिसोदे हे दोघे काही कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास जिनिंगमध्ये पोहोचले. त्यावेळी तेथे उमेदवार सुरेश वरपुडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जिनिंगच्या प्रवेशद्वारावरच अब्दुल युनूस अब्दुल करीम याने शहरप्रमुख कच्छवे यांना धक्काबुक्की केली. दोन्ही पक्षाच्या पदाधिका-यांत व कार्यकर्त्यांत बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख कच्छवे यांनी दिलेल्या फिर्यादीत उमेदवार सुरेश वरपुडकर, पंडितराव चोखट, इंद्रजित वरपुडकर, बाबूराव वरपुडकर, सचिन गुणाले, दशरथ हिंगे, भारत पाते, किरण देशमुख, गिरीश कत्रुवार, यश कत्रुवार यांनी उपशहरप्रमुख अशोक शिसोदे यांना पकडले व अब्दुल युनूस याने मारहाण केली. तसेच कच्छवे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची साखळी, एक तोळ्याची अंगठी व पाच हजार रुपये काढून घेतल्याचे म्हटले आहे.