आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Leader Subhash Desai News In Marathi, Jalna

नुकसान भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; सुभाष देसाई यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे फळपिकाबरोबरच इतर पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सरकार झोपेचे सोंग घेत असून या नुकसानीचा अहवाल तयार करून सरकारने आठ दिवसांत मदत न दिल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते सुभाष देसाई यांनी दिला.

अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रविवारी सुभाष देसाई यांनी दौरा केला. शेतकर्‍यांवर मोठे संकट पडले असतानाही सरकार वीजबिलासाठी सक्ती करीत आहे. बँका वसुलीचा तगादा लावत आहे. या नुकसानीबाबत काँग्रेस आघाडी सरकार गंभीर नसून निवडणुकीत पुन्हा आपली सत्ता कशी येईल या काळजीत आहे. बुधवारी केंद्रीय पथक येऊन पाहणी करणार आहे. पुढे केव्हातरी तुटपुंजी मदत देण्याचे आश्वासन देऊन जखमेवर मीठ चोळणार. चालढकल करून शेतकर्‍यांना भूलथापा देणार हे आम्हाला मान्य नाही, असेही ते या वेळी म्हणाले.