आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे चार तास रास्ता रोको आंदोलन; वीज कंपनीविरोधात खासदार जाधवांची आक्रमकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजेच्या प्रश्नांवर खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अधीक्षक अभियंता कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन केले. छाया : योगेश गौतम - Divya Marathi
विजेच्या प्रश्नांवर खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अधीक्षक अभियंता कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन केले. छाया : योगेश गौतम

परभणी- वीज कंपनीच्या कारभाराविरोधात शिवसेनेचे खा.संजय जाधव यांनी गुरुवारी (दि. सात) केलेले आंदोलन आजवरचे सर्वाधिक आक्रमक आंदोलन ठरले. तब्बल चार तास राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवण्यात आला. यादरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यासह प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.  अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर दुपारी तीनच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.   

 
खा.जाधव यांनी आठ दिवसांपूर्वी वीज कंपनीच्या कारभाराविरोधात निवेदन देऊन ग्रामीण भागातील विजेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली होती. परंतु, कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने खा. जाधव यांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून परभणी-जिंतूर रस्त्यावर अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांसह ठाण मांडले होते.


वाहतूक विस्कळीत..   
परभणी ते जिंतूर व सेलू मार्गे जाणारी व येणारी वाहतूक शिवसेनेच्या आंदोलनाने सकाळी दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला तरीदेखील तब्बल चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

बातम्या आणखी आहेत...