आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवना-टाकळी प्रकल्पातून कालव्यात पाणी सोडण्यास विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर - कन्नड तालुक्यातील शिवना-टाकळी प्रकल्पातून कालव्यात पाणी सोडण्यासाठी पंधरा गावांतील नागरिकांसह ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. पुनर्वसित पाच गावांसह इतर दहा गावांचा पाणीपुरवठा असलेल्या शिवना -टाकळी मध्यम प्रकल्पात आजमितीस फक्त २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पुढील पाणीटंचाई लक्षात घेता कालव्यात पाणी सोडण्यास प्रकल्पग्रस्तांसह शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून प्रकल्पातील शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी परिसरातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांकडे बैठकीत केली.

प्रकल्पाच्या पाणी फुगवट्यात व पाणलोट क्षेत्रातील पाणी संपले आहे. यावर्षी पाऊस जेमतेम राहिल्याने पर्यायाने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे. विहिरी, नदी, नाले हिवाळ्यातच आटल्याने या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पावरच अवलंबून राहावे लागणार आहे. प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन व कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी सहायक अभियंता (जलसंपदा), मुकेश भामरे, सौरभ पिंगळे यांनी प्रकल्पग्रस्त व परिसरातील लोकप्रतिनिधींची टाकळी येथे बैठक बोलावली होती. २५ टक्के पाणीसाठा असून प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून कालव्यात पाणी सोडण्याच्या विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी आबासाहेब आहेर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोणत्याही परिस्थितीत कालव्यात एक थेंब पाणी सोडू देणार नसल्याचे खडसावून सांगितले.

या गावांना बसू शकते पाण्याची झळ
परिसरातील विस्थापित झालेले जैतापूर, आलापूर, अंतापूर, वैसपूर, केसापूर व इतर टाकळी (ल), गल्लेबोरगाव, हतनूर, टापरगाव, चापानेर, शिवराई, खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव गावाच्या पाणीपुरवठा योजना या प्रकल्पाच्या भरवशावरच असताना वेरूळ येथेही याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.
बातम्या आणखी आहेत...