आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivbandhan Worshiped In Shivsena, Yuvasena Supremo Aditya Thakare Presented

तुळजापुरात शिवसेनेच्या शिवबंधांचे पूजन,युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - आगामी काळात राज्यात होणा-या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यांमध्ये शिवसैनिकांना बांधण्यात येणा-या शिवबंधांचे सोमवारी (दि. 20) येथील तुळजाभवानी मंदिरात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. या वेळी ठाकरे यांनी नवचंडी व भवानी सहस्रनाम हवनामध्ये पूर्णाहुती देऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळण्यासाठी तुळजाभवानी मातेला साकडे घातले.
मंदिरामध्ये सुरुवातीला नवचंडी व भवानी सहस्रनाम हवनास सुरुवात करण्यात आली. याचे यजमानपद शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सपत्नीक भूषवले. या वेळी नवग्रह, चतुषष्ठी, योगिनी, ईशान्य कलश व गणेश महापूजनही झाले. ठाकरे यांनी या वेळी कोहळ्याची पूर्णाहुती दिली. या वेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, विनायक राऊत, रवींद्र नेरलेकर, लोकसभा मतदारसंघ पक्ष निरीक्षक गौरीश शानभाग, जिल्हाप्रमुख प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ज्ञानराज चौगुले आदी उपस्थित होते.
प्रसिद्धी माध्यमांना टाळले
ठाकरे व राऊत यांना प्रश्न विचारण्यासाठी सकाळपासून विविध वृत्तवाहिनी व वृत्तपत्र प्रतिनिधी ताटकळत उभे होते. मात्र, दोघांनी सर्व प्रतिनिधींना टाळले.