आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवकांता यांची जमीन ‘नाम’ने ट्रॅक्टरने नांगरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- मुखेड तालुक्यातील होनवडज येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी शिवकांता मारुती जाधव हिचे वृत्त "दिव्य मराठी'त प्रसिद्ध होताच नाम संघटनेने त्या वृत्ताची दखल घेतली. शिवकांताची दोन एकर जमीन नामतर्फे नांगरून दिली पेरणीसाठी मदत करण्याचे सांगण्यात आले.

होनवडज येथील मारुती जाधव या शेतकऱ्याने गेल्या वर्षी आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शिवकांताची दोन मुले ती हवालदिल झाली. त्यात सलग दोन वर्षांपासून दुष्काळ असल्याने आर्थिक परिस्थितीही हलाखीची झाली. पेरणीसाठी पैसे नव्हते. पत्नी शिवकांताने पेरणी करण्यासाठी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवले. परंतु पैशाची सोय झाल्याने कुटुंबातील पुरुष व्यक्तींना औताला जुंपले पेरणी करण्याचा प्रयत्न करून समाजाचे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सोमवारी "दिव्य मराठी'ने हे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन नामचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक बेलखोडे, प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार यांनी मुखेड येथील नामचे प्रतिनिधी संदीप पिल्लेवाड, राजू भालके, लखन चौडेकर, स्वरूप देवकांबळे यांना होनवडजला पाठवले. या प्रतिनिधींनी शिवकांताची दोन एकर जमीन ट्रॅक्टरने नांगरून दिली.
बातम्या आणखी आहेत...