आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Activist Change Party In Badnapur Jalna

बदनापूर तालुक्यातील शिवसैनिक पक्षांतराच्या तयारीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर - तालुक्यात अनेक संस्थांवर शिवसेनेची सत्ता असतानाही पदाधिकारी व सहकार्‍यांकडून सहकार्य मिळत नसल्याने अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घडामोडी होत असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
बदनापूर तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गण युतीच्या ताब्यात आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष सांबरे यांना निवडून आणण्यासाठी या भागातील शिवसैनिकांनी मोठे पर्शिम घेतले आहेत. परंतु निवडून आल्यानंतर आमदार सांबरे यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गेल्या दोन वर्षात आमदार फंडातून एकही योजना राबविण्यात आलेली नसल्यामुळे कार्यकर्त्यांत विकासकामावरून असंतोष खदखदत आहे. त्यामुळेच अनेकांनी पक्ष सोडण्याची तयारी दर्शविली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका सेनेला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बदनापूर तालुक्याचा विकास केला जात नाही. विकास कामांना पदाधिकारी सहकार्य करीत नसल्याचा आरोप उपतालुकाप्रमुख शेख अयुब यांनी केला आहे.