आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला दणका; सुधीर पाटलांसह समर्थक भाजपत, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत सेनेला बसणार फटका!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 उस्मानाबाद- मूळचे शिवसैनिक असलेल्या व काही वर्षे राष्ट्रवादीमध्ये स्थिरावलेल्या सुधीर पाटील यांनी गुरुवारी (दि. २७) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पुण्यातील पिंपरीमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेला मोठा दणका बसू शकतो. दरम्यान, शिवसेनेतील आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.  
 
रसातळाला गेलेल्या शिवसेनेला उभारी देऊन सुधीर पाटील यांनी जिल्ह्यातील गावागावात सेनेच्या शाखा स्थापन केल्या होत्या.  त्यांच्यावर पक्षाने जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने रोख स्वरूपात मदत देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली होती. दुष्काळात जनावरांना पिण्याच्या पाण्याचे हाळ वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन मोफत शिक्षण, शेतकऱ्यांच्या मुलींचा विवाह सोहळा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेटजवळगा ते सोनारी पायी दिंडी, असे उपक्रम राबवून सुधीर पाटील यांनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद निर्माण केली होती. मात्र, सहा महिन्यांपासून सेनेत गटबाजी उफाळून आली. या गटबाजीमुळे त्यांना काम करताना अडचणी निर्माण झाल्या. निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याचे अधिकारही न उरल्याने सुधीर पाटील यांनी नाराजी व्यक्त करत पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे  जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी जिल्ह्यातील त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, विभागप्रमुख, शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिक्षण संकुलाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दबदबा असलेल्या सुधीर पाटील यांचा जिल्ह्यातील राजकारणावरही प्रभाव असून त्यांनी भाजपत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील भाजपला बळ मिळणार आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये  भाजपची ताकद वाढण्यास  मदत होऊ शकते.  
 
सेनेतील नेते भाजपच्या वाटेवर   
 पाटील यांच्यानंतर  सेनेतील काही बडे नेते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची  चर्चा सुरू आहे. पक्षात अंतर्गत कलह टोकाला गेला असून परंड्यात आमदार तानाजी सावंत , माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यात विस्तवही जात नाही. सावंत यांच्यावर नाराजी व्यक्त करत ज्ञानेश्वर पाटील जि.प. निवडणुकीच्या तोंडावर सेना सोडण्याच्या तयारीत होते. मात्र, माजी आमदार ओमराजे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली. ज्ञानेश्वर पाटील यांनी  आगपाखड करत सावंतसोबत माझे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगून पक्ष सोडणार ल्याचे म्हटले होते.
 
हे पण वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...