आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सेनेच्या ‘गटबाजीचा ढोल’; कर्जाच्या लाभाविषयी संभ्रम निर्माण झाल्याने आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड शहरातील पेठबीड भागातील जिल्हा बँकेच्या मोंढा शाखेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार सुनील धांडे, माजी जिल्हाप्रमुख अॅड.चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे. - Divya Marathi
बीड शहरातील पेठबीड भागातील जिल्हा बँकेच्या मोंढा शाखेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार सुनील धांडे, माजी जिल्हाप्रमुख अॅड.चंद्रकांत नवले, उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे.
बीड - शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बीडमध्ये एकाच ठिकाणी ढोल बजाओ आंदोलन करण्याचे खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले असताना बीडमध्ये एकीकडे पाच उपजिल्हाप्रमुखांसह माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनी मोंढा भागातील जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन केले.
 
दुसऱ्या गटातील दोन जिल्हाप्रमुखांसह माजी मंत्र्यांनी थाळीनाद आंदोलन केले. एकाच शहरातील पक्षाच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनांमुळे शिवसेनेतील गटबाजी उफाळून आल्याचे समोर आले. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पक्षप्रमुखांचा आदेश डावलणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.  
 
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीपासून शिवसेनेत गटबाजी सुरू झाली आहे. सध्याचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यावर त्यांच्या बाजूने जनमत नसल्याचा आरोप पदाधिकारी करत आहेत. बीड पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार विनायक मेटे, आमदार क्षीरसागर व  जिल्हाप्रमुख जगताप एकत्र आल्याचे शिवसैनिकांना रुचले नाही. जिल्हाप्रमुखांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वीच औरंगाबादच्या बैठकीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या बैठकीत जिल्हा  संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी काम करणारे लोक हवेत असे सांगून बदलाचे  संकेत दिले होते. त्यानंतर जिल्हाप्रमुख बदलाचे वारे सुरू झाले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड. चंद्रकांत नवले, सुनील धांडे, उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, विलास महाराज शिंदे हे जिल्हाप्रमुख होण्याच्या तयारीला लागले. सोमवारी कर्जमुक्तीसाठी  बीड शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक व मोंढा येथील जिल्हा बँक शाखा अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंादोलने झाली आहेत. पेठ बीड भागातील जिल्हा बँकेच्या मोंढा शाखेसमोर ढोल बजाओ आंदोलन झाले असून या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, माजी आमदार सुनील धांडे, अॅड.चंद्रकांत नवले, विलास महाराज शिंदे यांच्यासह एक हजार शेतकरी सहभागी झाले होते. 
 
शिवसैनिक निरोपाची वाट पाहत नाही   
- ग्रामीण जनतेचा प्रत्यक्ष संबंध व शेतकऱ्यांच्या तक्रारी अधिक असल्याने आम्ही मोंढा शाखेसमोर  आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, माजी आमदार या सर्वांनी ढोल बजाओ आंदोलन केले.   शिवसैनिक निरोपाची वाट पाहत नसतो,  त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आम्ही अाजचे आंदोलन केले आहे. अशाच प्रकारचे आंदोलन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे.  
अॅड. चंद्रकांत नवले, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना
 
त्यांनी उद्धव साहेबांचा आदेश मोडला   
- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्याएेवजी बीडमध्ये जिल्हा बँकेसमोर एकाच ठिकाणी मोठे आंदोलन करावे, असे आदेश दिले होते. आम्ही पदाधिकाऱ्यांना  निरोप देऊन आंदोलनाला उपस्थित राहावे, असे बजावले होते. परंतु पक्षाचा आदेश डावलत काही जण हजर राहिले नसून अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मी उद्धव साहेबांना कळवणार आहे.  
अनिल जगताप, जिल्हाप्रमुख, शिवसेना   
 
दोन जिल्हाप्रमुखांचा  जिल्हा बँकेसमोर थाळीनाद   
बीड शहरातील राजुरी वेस येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसमोर जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद करण्यात आला. शासनाची कर्जमाफी निव्वळ धूळफेक करणारी असून सरसकट कर्जमाफी द्यावी, नसता शिवसेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला. या आंदोलनात माजी मंत्री बदामराव पंडित, युद्धाजित पंडित, गणेश वरेकर, उल्हास गिराम, किशोर जगताप, युवा सेनेचे सुशील पिंगळे, सुधीर शिंदे, सुनील अनभुले आदी सहभागी झाले होते.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> पात्र सर्व शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करावेत
> कर्जाच्या लाभाविषयी संभ्रम निर्माण झाल्याने आंदोलन
> माफीची यादी बँकांनी नोटीस बोर्डावर लावावी
​> चांगली वसुली केल्यामुळे जिल्हा बँकेचा केला निषेध
>  सरकारला जागे करण्यासाठी वाजवले ढोल!
 
हे पण वाचा,
बातम्या आणखी आहेत...