आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फिक्सिंग: फडणवीस, विरोधकांनीही डागली भाजपवर तोफ (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी: मुख्यमंत्री फडणवीस यांचासह मान्यवरांचा सत्कार करताना. - Divya Marathi
परभणी: मुख्यमंत्री फडणवीस यांचासह मान्यवरांचा सत्कार करताना.
पिंगळी (ता.परभणी) - ज्यांच्याविरुद्ध लढता-लढता हयात गेली, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेनेचे प्रत्येकच जिल्ह्यात कुठे ना कुठे फिक्सिंग आहे. परभणीतही शिवसेनेने काँग्रेसशी फिक्सिंग केली असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेच्या तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.१२) पिंगळी (ता.परभणी) येथे केले.  लातूर, नांदेडमध्येही त्यांनी प्रचार सभा घेतल्या. नांदेड, लातूरला मराठा आरक्षणावरून काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सभेनंतर त्यांना सोडून देण्यात आले.
 
माजी मुख्यमंत्री विलासरावांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार? मला कुणी तरी सांगितले - फडणवीस 
राज्य आणि केंद्र सरकार स्थानिक स्वराज संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी देते. पण त्याचा वापर व्यवस्थित होत नसल्याने जनतेला योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पारदर्शक कारभाराची गरज आहे. लातूरची जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा पुतळा बसवला आहे, परंतु त्यांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार झाल्याचे मला कुणी तरी सांगितले. पण काय झाले ते मला नक्की माहीत नाही. जर ही गोष्ट खरी असेल तर फार वाईट घडत असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात व्यक्त केली.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारने मागील तीन वर्षांत शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, वीज आदी क्षेत्रात केलेल्या विकास कामांचा, योजनांचा आढावा सादर केला. परभणी, लातूर आणि नांदेडमध्ये त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
 
नांदेड: तीन तरुणांच्या मराठा आरक्षणावर घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांचे नांदेडला भाषण सुरू असताना तीन तरुण उठून उभे राहिले व त्यांनी मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्रीही गडबडून गेले. मात्र, त्यांनी लगेच घोषणा देणाऱ्या तरुणांना उद्देशून मराठा समाजास आरक्षण आमचेच सरकार देणार, असे आश्वासन नरसी येथे दिले.  

लातूर: आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना घेतले ताब्यात
फडणवीस सभास्थळी येण्याअगोदर काही मिनिटे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी अशा विविध मागण्या घेऊन  नऊ ते दहा तरुण प्रवेशद्वाराला उभे होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. तरुणांचा सभेत घुसून पत्रके वाटण्याचा इरादा होता. 
 
उद्धव ठाकरे शोलेतील अासराणी - लोणीकर
शिवसेनेचा समतोल सध्या बिघडला असून उद्धव ठाकरे यांची स्थिती शोलेतल्या आसराणीसारखी झाल्याचा टोला मंत्री लोणीकर यांनी लगावला. मराठा व धनगर आरक्षणावर लवकरच तोडगा निघेल, असे खा.महात्मे म्हणाले.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा रामदास कदम यांची भाजपवर टीका आणि धनंजय व पंकजा मुंडे यांचे आरोप-प्रत्‍यारोप... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...