आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड मनपातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे राजीनामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड-  मनपाची निवडणूक आजच जाहीर झाली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या  तीन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक अशा चार नगरसेवकांनी आपला राजीनामा बुधवारी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे दिला. मनपाची निवडणूक जाहीर झाल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी महापालिकेतील काँग्रेसच्या पाच, शिवसेनेच्या चार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यामध्ये शिवसेनेच्या तीन नगरसेवकांची भर पडली आहे. जयश्री जाधव, डॉ. सुदर्शना खोमणे, शाम बन (स्वीकृत)या शिवसेनेच्या तीन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदूताई घोगरे यांनी राजीनामा दिल्यामुळे राजीनामा देणाऱ्यांची संख्या १५ झाली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...