आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: मावेजासाठी शेतकऱ्यांचे शोले स्टाइल अांदाेलन, जिल्हा प्रशासनाची धावपळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित  जमिनीचा मावेजा न मिळाल्याने १० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या कपिलधारवाडीच्या ८ शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने दोन शेतकरी भावांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडावर चढून शोले स्टाइल आंदोलन केले.  
 
कपिलधारवाडीच्या रुद्रसेन अश्रुबा म्हाकले यांच्यासह त्यांची चुलती लोचनाबाई  म्हाकले यांची एकत्रित जमीन आहे. धुळे- सोलापूर  या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात यातील काही जमीन संपादित झाली. परंतु  रुद्रसेन व त्यांच्या कुटुंबीयांना डावलून केवळ लोचनाबाई  व केरबा म्हाकले यांना भूसंपादन विभागाने मावेजा  दिला.  दोघांनाही समान मावेजा मिळावा म्हणून रुद्रसेन यांच्यासह कुटुंबातील आठ जणांनी २० फेब्रुवारीपासून  उपोषण सुरू केले. जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून शेतकरी शुक्रवारी सकाळी लिंबाच्या झाडावर चढले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ झाली.
बातम्या आणखी आहेत...