आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत विदर्भापेक्षाही अधिक अन्याय मराठवाड्यावर झाला - श्रीहरी अणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना येथे महिलांना साडी-चोळी वाटप करताना श्रीहरी अणे. याप्रसंगी अॅड.प्रदीप देशमुख, बाबा उगले आदी. छाया : गौरव बुट्टे - Divya Marathi
जालना येथे महिलांना साडी-चोळी वाटप करताना श्रीहरी अणे. याप्रसंगी अॅड.प्रदीप देशमुख, बाबा उगले आदी. छाया : गौरव बुट्टे
जालना - मराठवाडा आणि विदर्भावर सातत्याने अन्याय झाला आहे. या अन्यायाचे भाग न पाडता आपले दु:ख एक आहे. हे समजून स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी मराठवाड्याने आवाज उठवावा व त्यास विदर्भाने खांदा द्यावा. एकमेकांवर वार करून काहीच साध्य होत नाही तर सोबत राहूनच दोन्ही राज्यांची निर्मिती होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केले. रविवारी मराठवाडा मुक्ती माेर्चातर्फे आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साडी-चोळी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख, संयोजक प्रा. बाबा उगले, अॅड. किशाेर राऊत, गणेशलाल चौधरी, अशोक मिश्रा, प्रकाश जैन, प्राचार्य मधुकर मुंडे, कॉ. सगीर अहेमद, आदींची प्रमुख उपस्थिती होती.अणे म्हणाले, स्वतंत्र विदर्भासाठी ४० वर्षे संघर्ष सुुरू आहे. मराठवाडा स्वतंत्र्य होण्यासाठी आज ठिणगी पडली. राज्य निर्मितीची क्रिया मुंबईत घडत नसते, दिल्लीतून ही प्रक्रिया पूर्ण होत असल्याने मुंबईची दखल घेण्याची गरज नाही. यासाठी दिल्लीवर दबाव वाढवावा लागेल.

पूर्वी विदर्भ, गुजरात, मराठवाडा मिळून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यातून गुजरात बाहेर पडले. मात्र, दोन्ही भाग अडकून पडले. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाचे निराकरण करण्यासाठी राज्याचा महाधिवक्ता या नात्याने आपण सदैव तत्पर असल्याचेही अणे म्हणाले.

दरम्यान, अॅड.प्रदीप देशमुख म्हणाले, मराठवाड्याला चारवेळा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली मात्र, याविभागाचा विकास काही झाला नाही. स्वतंत्र राज्यासाठी आपलाही पाठिंबा आहे. मात्र, नागपूर कराराचा भंग होऊ नये, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...