आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यपदी काकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी औशाच्या श्रीपती काकडे यांची, तर उपाध्यक्षपदी उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांची निवड करण्यात आली. संचालकांच्या १९ पैकी १७ जागा काँग्रेसकडे असल्यामुळे दोन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या.

लातूर जिल्हा बँकेची निवडणूक या महिन्यातील सात तारखेला पार पडली होती. त्यामध्ये काँग्रेसला बहुमत असल्यामुळे त्यांचाच अध्यक्ष होणार हे नक्की होते. अध्यक्षपदाची निवड शुक्रवारी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एन. घोलकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी अध्यक्षपदासाठी श्रीपती काकडे, तर उपाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर भोसले या दोघांचेच अर्ज आले. दरम्यान, या पदासाठी नाथसिंह देशमुख यांची निवड झाल्याचे गुरुवारी रात्रीपर्यंत सांगण्यात येत होते. मात्र, ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करून काकडेंची निवड करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...