आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत मुस्लिमांचा मूकमोर्चा; म्यानमारमधील अत्याचार, शरियतमधील हस्तक्षेप थांबवण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- मुस्लिम समाजाला आरक्षणासह म्यानमारमध्ये मुस्लिम समाजावर होत असलेले अत्याचार थांबवावेत, मुस्लिम शरियतमधील शासनाचा हस्तक्षेप थांबवण्यात यावा, आदी विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी (दि.१०) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर   मूकमोर्चा काढला. मोर्चातील समाजबांधवांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.  

जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावरून दुपारी दोन वाजता मोर्चास सुरुवात झाली. शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्गे शिवाजी पुतळ्यासमोरील मैदानात पोहोचलेल्या या मूकमोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी अब्दुल खदीर, वसीम, मौलाना तजम्मुल, मौलाना अब्दुल रशीद, अजहर इनामदार, मौलाना रफियोद्दीन आदींनी मनोगत व्यक्त केले. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात देण्यात यावे, म्यानमारमधील मुस्लिम समाजावरील अत्याचार थांबवावेत, त्यासाठी केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र संघामध्ये मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा, ट्रिपल तलाकसंदर्भामध्ये शासनाने इस्लामी शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा, लव्ह जिहादच्या नावाखाली समाजाला बदनाम करण्याचे काम थांबवावे, आदी विविध मागण्या या वेळी मान्यवरांनी केल्या.  

मोर्चात मौलानांसह व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व युवकांचा सहभाग मोठा होता. हाफिज मौलाना, रफियोद्दीन अशरफी, हाफिज सय्यद निसार अहमद, मौलाना अब्दुल कादर मिल्ली, डॉ.तय्यब बुखारी, उपमहापौर माजूलाला, हाफिज जाऊस, वसीम कबाडी, अब्दुल कादर, अल्ताफ मेमन, उबेद शालिमार, जान मोहंमद जानू, गुलमीरखान, गौस झेन आदी मोर्चात सहभागी झाले होते. मुस्लिम इन्साफ कौन्सिलच्या जिल्हा शाखेतर्फे  मोर्चाचे आयोजन केले होते.
बातम्या आणखी आहेत...