आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड पालिका कुणाची, आतापासून निवडणुकीची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली नगर परिषद निवडणूक शहराच्या व तालुक्याच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय आहे. नगर परिषद स्थापनेपासून तीन घटनांचा अपवाद वगळता एकहाती वर्चस्व ठेवणा-या आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याच्या चर्चेचे गु-हाळ सुरू आहे.
सत्ताधाºयांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे प्रयत्न वगळता मतदारांमध्ये विश्वास निर्माण होईल, असे ठोस कार्यक्रम विरोधकांकडून हाती घेतले गेले नाहीत. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेवकांचा कालावधी फेब्रुवारी 2014 मध्ये संपत असल्याने जानेवारीमध्ये निवडणुकीचा कार्यकम जाहीर होईल. तेवीस नगरसेवक असलेल्या या नगरपालिकेत कॉँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व आहे. कॉँग्रेसचे 17, भाजपचे चार तर शिवसेनेचे दोन नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती व असेच पक्षीय बलाबल असते. याला 1९९९ च्या निवडणुकीचा अपवाद असून माजी आमदार कै. माणिकराव पालोदकर व आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्याने कॉँग्रेसच्या तिकीट वाटपात दोघांनाही 50 टक्के अधिकार देण्यात आले होते. सात प्रभागांमधून 23 नगरसेवक निवडून आले होते. 20 कॉँग्रेस व दोन शिवसेना व एक भाजप असे बलाबल होते; परंतु आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधातील गटाने युतीशी हात मिळवणी केल्याने बनेखॉँ पठाण नगराध्यक्ष झाले होते; परंतु ही युतीही अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ टिकली नाही.

पाण्याचे राजकारण
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत 25 मे रोजी झालेल्या मेळाव्यात नगर परिषद निवडणुकीची सुरुवात आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. विरोधकांनी दुष्काळात पाण्याचे राजकारण करायचे होते, असा आरोप केला. विरोधकांकडून याला अद्याप उत्तर मात्र दिले गेलेले नाही.