आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा - सिंधुताई

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - ज्या जात्यामधून काही बाहेर येतं, त्याला जातं असं नाव का ? या बहिणाबार्इंच्या कवितेची आठवण करून देत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी थेट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भावनेलाच हात घातला.
जालना येथील डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी अध्यक्ष सुरेश अग्रवाल, अरुण अग्रवाल, प्राचार्या कविता पराशर आदींची उपस्थिती होती. पुढे सिंधुताई म्हणाल्या, ज्या मुलांना कुणीच नाही त्यांची मी आई झाले, मायेचा हात मी दिला आहे. त्यांच्यात राहून सामान्य जीवन जगले. खुद्द जालन्यातून जाणा-या रेल्वेत भीक मागितलेली आहे. जेव्हा मला माझ्या घरातून काढून दिले तेव्हा माझ्याकडे फक्त अंगावरील कपडे आणि तीन महिन्यांचे बाळ होते. त्या काळात रेल्वेत भीक मागून उपजीविका भागवली. त्या वेळच्या प्रसंगावरून मला अनाथपण अनुभवास मिळाले. माय नसलेल्या लेकराची, अनाथांची काय दैना होते हे सर्व अनुभव घेत मी आज येथे येऊन पोहोचले आहे.